Me Sahyadri October 2018 A

/ Sahyadri Geographic by Vivek Kale
 

 
 


 

Me Sahyadri
July2018
Volume 5, number 18, # 72
Mysteries of Maval Caves – Sai Cave
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded. Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation. Please give sufficient time to allow the photographs to load. Special thanks to all those who helped me during the compilation and for the help and guidance during the activity.
 
देशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.
सह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.
As the economic development has taken the center stage, the balance between the environmental sustenance and socio economic development will be under the scanner. As most experts with balanced views have proclaimed, Indian wildlife and ecological system sustenance will be under threat, unless precautions are taken with the help of appropriate research and long term national interests. As we encounter the economic development, many habitats which indirectly or directly help sustainable development will be damaged. The awareness to gauge the success by sustainable development and not by year to year growth is a distant dream any environmentalist will assume in current scenario.
Western ghats, or Sahyadri as we all call it as, is a treasure trove of spectacular landscapes, biodiversity, flora, fauna, some amazing geological wonders and man made monuments. With the increasing pressure from human encroachment, all these elements are under stress and in turn are under depletion. Western ghats should be left untouched by human beings, to protect their future generations from getting short of resources, such as water, energy and clean air. The important elements of western ghats, which need protection are highlighted in the new version of Photo journal, Me Sahyadri Magazine.
 

 

““
 
Me Sahyadri – October 2018 A
 
मावळ लेणी मोहेमेचा सारांश :
मावळातील भाजे, बेडसे आणि कार्ले लेणी अप्रतिम आहेत. त्यामुळे या भागातील इतर लहान लेण्यांकडे फारसे कोणी फिरकत नाही. आम्ही चार समविचारी मित्रांनी मात्र या हरवलेल्या लेण्यांची शोधाशोध करण्याचे ठरवले. साईप्रकाश बेलसरे, निनाद बारटक्के, अमेय जोशी आणि विवेक काळे असा संघ तयार झाला. एकोणीसाव्या शतकात जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन या दोन इंग्रज विद्वानांनी भारतातील लेणी धुंडाळली. त्यांनी १८८० साली "केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया" या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात मावळातील लहान लेण्यांचा फारसा तपशिल नसला तरी, या मावळातील इतर लहान लेण्यांबद्दल ५-६ वाक्यांमध्ये आम्हाला त्रोटक का होईना माहिती मिळाली. त्यांनी उल्लेख केलेली, काही ठिकाण सापडली, तर काही ठिकाण काहीही केल्या सापडेनात. कदाचित न सापडलेली ठिकाण नष्ट झाली असावीत. पण मोहिमे दरम्यान नविन, ज्या ठिकाणांचा पुस्तकात उल्लेख नव्हता, पण ग्रामीण भागातल्या स्थानिकांना माहिती होती अशी ठिकाण सापडली.
जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन या दोन इंग्रज विद्वानांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा धागा म्हणुन वापर करायचे ठरले. कामांचे वाटप झाले.
शोध मोहिमेत लागणाऱ्या खाऊची सोय करणे, विषय आणि ठिकाणाचा आधी अभ्यास करणे, प्रवासाची सोय करणे, गावकऱ्यांकडे लेण्यांबद्दल चौकश्या करणे, मोहिमे दरम्यान गचपणातुन वाट शोधणे, लेण्याच्या अवशेषांची मोजमाप घेऊन त्याची चित्रे/नकाशे काढणे, छायाचित्रे काढणे, जि. पि. एस. यंत्रावर वाटेबद्दल माहिती नोंदवणे, लेण्यात लहान बारकावे शोधणे, लेण्यांचे विश्लेषण करणे, नोंदी करणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची काम वाटुन घेण्यात आली. प्रत्येक ठिकाणी जाताना, घरचा अभ्यास करावा लागला. जुनी पुस्तके, नकाशे धुंडाळले गेले. गावातल्या मित्रांची मदत झाली. गावागावात चौकश्या केल्या. गडद, लेणे, गुहा, कपार, भोगदा, विहार, पांडवांनी एका रात्री बनवलेली गुहा असे अनेक शब्द वापरुन चौकश्या झाल्या. बहुतेक वेळा असे काही नाही इथे ! तुम्ही कुठुन आलात ? असे उत्तर मिळाले. लेणे आहे का इथे कुठे असा प्रश्न विचारला तर आम्हाला बहुतेकांनी कार्ले/बेडसे/भाजे लेण्यांचा पत्ता दिला. पण बकऱ्या, गाई घेऊन डोंगरात फिरणारे गुराखी मात्र दरवेळेला मदतीला धाउन आले. वाटांचे आणि दिशांचे अंदाज मिळाले. जुजबी माहिती घेऊन ठिकाण शोधणे या प्रकाराचा चांगला सराव झाला. कधी काटेरी करवंदींच्या खालुन खुप सरपटाव लागल तर कधी घसाऱ्यावर हात टेकावे लागले.
लेण्यांमध्ये मोठे कोळी (स्पायडर), कातळ पाली, वटवाघळ, मधमाश्या, पाकोळ्या, घुबडं भेटले. आमच्या मुळे त्यांना उगाच त्रास झाला, असा अपराधीपणा वाटला. प्रत्येक शोधमोहिमेला यश आलेच असे नाही. काही ठिकाण सापडली नाहीत. तर काही ठिकाण आमच्याच मनाचे खेळ आहेत असे लक्षात आले. बहुतांश ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारची जोखिम होती. वटवाघळ, लेण्यातील धुळ, काळोख, मधमाश्या, काटेरी वनस्पती, घसारा, गुहेतील ऑक्सिजन चा अभावआणि इतर न दिसणारे धोके यावर मात झाली. मोहिमेसाठी, विजेऱ्या, जि. पि. एस., मोजपट्या, दोऱ्या, लेजर यंत्र, नकाशे, गुगल मॅप, जाळीच्या टोप्या या सर्व जंत्रीचा उपयोग झाला. एकूण मिळुन २० नविन अपरिचित ठिकाण/वास्तु पहायला मिळाल्या, मावळाचा भुगोल जरा अजुन नीट लक्षात आला. नविन प्रश्न पडले आणि नविन कोडी सोडवयाला मिळाली. तर्क वितर्क झाले.
About the Maval Cave exploration :
The main caves in Maval region are so significant that other small hermit caves are often overlooked. We as a team of four like minded friends, decided to explore the Maval region for these small hermit caves. We explored and found few beautiful places. The very concept of creating a hermit cave somewhere high up in the hills is fascinating. These places often are full of tranquility and nothing else. With very little architectural evidences and clues, the academicians have obviously ignored these places. It was James Fergusson and James Burgess, during their exhaustive study of “Cave temples of India, 1880” mentioned few of these hermits in Maval region of Pune district. With the little clues and exhaustive investigation, team of four members, Saprakash Belsare, Amey Joshi, Ninad Bartakke and Vivek Kale started the exploration. The journey to locate, trek and analyse these hermit caves itself was fascinating. We met many villagers who were unaware of these places, but also met few shephards who were precisely aware of the hermits and gave us tentaive guidance.
There is a very brief mention about the misceleneous caves of Maval by James Fergusson and James Burgess in their work. Based on available information we decided to search these caves and monuments. The activities were planned. The food, travel , track exploration in difficult and routes full of foliage, enquiring the villagers about the caves, taking measurements and drawing skecthes and maps, photography, GPS data collection, making notes and analysing the information, observing the minor details of the caves etc activites were distributed amongst the team members. We met many bats, owls, geckos, lizards, large spiders, martins, honeybees during the treks. Often we felt sad that we disturbed them to see the caves. Most of these places are hazardous due to pitch darkness, bats, dust, thorny plants, honeybees, low oxygen level in caves and rock patches etc. Not all the attemps were successful. Sometimes we could not find the intended places and sometimes we realised that the cave was just our imagination and did not exist. Nevertheless we saw about 20 new strange caves/monuments during the exploration. The high intensity torches, GPS tool, measuring tapes and measuring laser tool, Honeybee protection caps, maps, google maps, photographs etc were useful during the mission. In this photoessay, I have compiled the information and photographs of Sai Cave, Maval, amazing, simple but questions-thrower cave.


 

 

““ 
The banner has been published here to improve the awareness of the trekkers and tourists visiting the various mountain forts, mountains in north western ghats. Please avoid accidents, by following good outdoor ethics such as no swimming in cisterns at mountain forts, no rock climbing without proper technical equipment and expertise. Please do not adventure, trek with any group or individually without understanding the risks associated. The frequency of the solo trekker fatalities have increased recently. Please strictly avoid solo treks. Please also avoid treks to mountains in large commercial groups, as it leads to damage to biodiversity of these high elevation ecological islands. Please respect the wildlife and biodiversity of the region. This has become more important as the ever increasing human interference is leading to severe damage to fragile ecosystems. Please be aware of the wildlife and biodiversity of the mountains before visiting these mountains. Please follow outdoor ethics. Follow ASI and Forest department rules. The concept of use of symbols for outdoor ethics was conceived and designed by "Sahyadri Trekker Bloggers Group".
 
 

 

 
1. Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
पुणे जिल्ह्यात, मावळ तालुक्यात कार्ले, भाजे आणि बेडसे येथे डोंगरांवर दगडात लेणी कोरली आहेत. मावळात या भागात, इतरत्र सुद्धा लहान विहार आणि लेणी आहेत. यातील एक लहान अपरिचित लेणे, मावळ तालुक्यात साई गावाजवळ डोंगरात आहे.
Around the famous Karle, Bhaje and Bedse Caves in Maval Tehsil of Pune district there are many smaller hermit caves in the hills. One of the interesting wonderful hermit is located in the hill near village called as Sai, in Nane Maval.
 

 

 
2. Map of region, Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात, पश्चिम पुर्व पसरलेली कार्ले डोंगररांग पश्चिमेकडे सह्याद्रीच्या घाट माथ्यापासून पूर्वेकडे वाळख गावापर्यंत १३ किलोमीटर लांब पसरलेली आहे. या डोंगररांगेत कार्ले लेणी आहे. या डोंगरारांगेच्या उत्तरेला एक समांतर डोंगररांग आहे. पश्चिमेकडे घाटमाथ्याजवळच्या ढाक गावापासुन पूर्वेकडे साई/फागणे गावा पर्यंत पसरलेली ही दाहुली डोंगररांग अंदाजे २५ किलोमीटर अंतर पसरलेली आहे. दाहुली डोंगर रांगेत साई गावाच्या दक्षिणेला आणि नानोली गावाच्या वायव्य दिशेला , साई गावाच्या दक्षिणेला डोंगरावर, घनदाट जंगलात अंदाजे ६०-७० मीटर उंचीवर (गावपातळी पासून) साई लेणी कोरली आहेत.
Sai is a village in Maval tehesil in Pune district in the state of Maharashtra in India. The village is located at the base of the one of the Sahyadri hill ranges on the Deccan plateau. Spread in west–east orientation. Karle hill range, is about 13 kilometer in length, from western ghat main ridge up to the Walakh village towards east. This hill range has important archaeological site at Karle. Further to north there is another parallel hill range spread from the Dhak at western ghat ridge, north of Lonavala up to the village Sai/Pahagane towards east. This Dahuli hill range which separates the Nane Maval and Ander Maval has a small cave in the forest south of village Sai
 

 

 
3. Layout - Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
साई आणि नानोली गावांच्या मधल्या भागात डोंगरात एका उभ्या कड्यावर घनदाट जंगलात साई लेणे आहे. मुळत: नैसर्गिक गुहेचे येथे थोडे छन्नी वापरून माणसाला राहण्यासाठी केलेले कोरीव काम आढळतें. ज्वालामुखी च्या ल्हावारसातून वायू चे बुडबुडे बाहेर पडल्यामुळे अशा गुहा तयार झालेल्या दिसतात. भिंतीवर छन्नी वापरून, या गुहेला थोडा आकार देण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. गुहेचा आकार ५ मीटर रुंद, ७ मीटर लांब आणि २. मीटर उंच आहे. येथे इतर अवशेष नाहीत. गुहेच्या मुखाजवळ एक छोटा बाक कोरला आहे. गुहेच्या पश्चिमेला काही अंतरावर एक छोटे उथळ पाण्याचे टाके आहे. गुहेत भिंत आणि जमीन ओबडधोबड आहे. माणुस एखाद्या नैसर्गीक गुहेत थोडा बदल घडवून आपल्या साठी वापर करत होता याचे हे एक साधे उदाहरण आहे. घनदाट जंगलात असल्यामुळे हे लेणे शोधणे जिकिरीचे आहे.
Cave : The Sai cave is located in the dense forest on the hill scarp. It is difficult to access and is not visible from distance as it is hidden in the canopy of the forest. It is originally a natural volcanic cave created out of escape of gas. These type of caves can be seen all across the western ghats. The natural cave which is about 5 meter wide, 2.5 meter high and 7 meter long is modifed by chiseling on its walls and ceiling. There are hardly any details in the cave. The cave has a small bench on the east side near the entrance. The ceiling is irregular and is not flat. The part of the back of the cave is chiselled to make a flat vertical walls. The rest of the back of the cave has deep crack with voids in the crack, which are natural. The backside crack has natural structure with lots of voids and rocks. There is a small shallow water cistern on the west of the cave, in the scarp. Though there is hardly anything in the cave, the cave is very intersting crude example of how early man used natural caves for shelter with minimal modifications.
 

 

 
4. Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
5. Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
6. Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
7. Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
8. Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
9. Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
10. Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
11. Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
12. Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
13. Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
14. Sai Cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
.
 
 
References :
1. Cave temples of India, London, 1880, Fergusson James and Burgess James.
2. Gazetters of Bombay Presidency, Poona District, Volume XVIII, 1885.
3. Buddhist architecture of western India, 1981, S. Nagraju.
4. Myth and Reality, Studies in the Formation of Indian Culture by D. D. Kosambi
5. History and Society, Problems of Interpretation, by D. D. Kosambi
 
 


For any queries and suggestions contact at kale_v@rediffmail.com